Friday, 23 January 2015

7th std rhymes (mp3)

English कविता / Rhymes: डाउनलोड करा.

  7th std rhymes (mp3)


6th std rhymes (mp3)

English कविता / Rhymes: डाउनलोड करा.

  6th std rhymes (mp3)



5th std rhymes (mp3)

English कविता / Rhymes: डाउनलोड करा.

  5th std rhymes (mp3)


Monday, 19 January 2015

मराठी स्वरमाला


स्वरमाला
मराठी स्वरमाला
अंअ:
मराठी स्वरमाला अशी आहे. यात ऋ आणि लृ देखील असतात.
मराठी व्यंजनमाला-
-
-
-
-
-
क्षज्ञ
ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या अद्याक्षरांनी मिळून केलेला 'क च ट त प' हा क्रम लक्षात ठेवावा व शेवटी 'यरलवशषसहळक्षज्ञ' असते हे ध्यानात ठेवावे.
वरील पैकी एखादे व्यंजन घेऊन व सर्व स्वरांचा उपयोग करून त्या व्यंजनाची बाराखडी (एकूण बारा रूपे) तयार होते. उदा. प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं प:

इंग्रजी महिने व त्यांचे दिवस


जानेवारी31फेब्रुवारी28 किंवा 29
मार्च31एप्रिल30
मे31जून30
जुलै31ऑगस्ट31
सप्टेंबर30ऑक्टोबर31
नोव्हेंबर30डिसेंबर31

थोर शास्त्रज्ञ

सर मो.विश्वेश्वरैया


बालपण
यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील
चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार
जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते
श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मा यांचे अपत्य
होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात
होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व
हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य
होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर
नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील
प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते.
त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन
शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव
त्यांची आंध्र
प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण
विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे
असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब
हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन
मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण
चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण
बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन
बी.ए.ची परीक्षा पास झाले.स्थापत्य
अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण
त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे
येथे घेतले.
अभियंता म्हणून वाटचाल
अभियांत्रिकीमध्ये स्नातक
झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे
सार्वजनिक बांधकाम विभागात
नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे
महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन
क्षेत्रात पाटबंधार्यांची एक अतीशय क्लिष्ट
योजना राबविली.
त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण
द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट
घेतले जी सन १९०३ मध्ये
पहिल्यांदा पुण्याजवळील
खडकवासला धरणास लावण्यात आली.
ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर
आल्यावर धरणास कोणताही धोका न होता,
उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात
आलीत.या द्वारांच्या कामात
मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर
व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात
आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे
पूरापासुन संरक्षण
करण्यासाठी जी प्रणाली विकसित
केली त्याने त्यांना सत्कार
मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास
समुद्री पाण्यापासुन गंजरोधक
करण्याची प्रणाली तयार
करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर
के.आर.एस.धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते
उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख
केली.या धरणाचे बांधकामाने,ते
बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात
मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे,
'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले
जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे
नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील
म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक
प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील
वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक
इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल
युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंक ऑफ
मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे
अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर
दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व
एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले
जात होते. तिरुमला-
तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए
त्यांनी योगदान केले.
म्हैसूर येथे दिवाण म्हणून
सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,म्हैसूर
या भारतातील मोठ्या व
महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन
त्यांना,नियुक्त केल्या गेले. कृष्णराज वोडेयार
चतुर्थ
या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण
विकासासाठी निर्विवाद असे योगदान
दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये
बंगलोर येथील शासकीय
अभियांत्रीकी महाविद्यालय
याची त्यांनी स्थापना केली.ती भारतातील
एक प्रथम अभियांत्रीकी संस्था होती.
ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य
संस्था आहे.
विविध सन्मान
त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक
ते म्हैसूर येथे दिवाण
असतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे,
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन
एंपायर' या सन्मानाने
गौरविल्या गेले.भारताला स्वातंत्र्य
मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न'
या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने
गौरविल्या गेले.
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन
एंपायर' पदक
सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय
इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन
स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन
इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने
फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील
अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर'
ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन
गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स
काँग्रेस चे अध्यक्ष होते

विक्रम साराभाई


भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह
आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार
म्हणून विक्रम साराभाई ओळखले जातात.
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म
अमदावाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२
१९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक
उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय
व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ
टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू,
महात्मा गांधी आदी लोकांचे
त्यांच्या घरी जाणे-येणे होते.
विक्रम साराभाई यांच्या आई
सरलादेवी यांनी आपल्या ८
मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती.
या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण
युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले.
त्याना लहानपणापासुनच गणित
आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत
होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७
साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील
केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे
महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व
त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ
सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर
सी. व्ही. रामन
यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर
संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम,
कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत
असलेल्या प्रसिद्ध
नृत्यांगना मृणालिनी साराभाई
यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय
आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम
साराभाई ब्रिटनला गेले. १९४७
साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन
ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट
मिळवली आणि त्याचवर्षी ते
आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन
त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे
Physical Research Laboratory
ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते,
पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम
साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील
भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात
महत्त्वाची भूमिका बजावली.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट
अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम
साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर
मध्येच केली होती.
आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने
अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले.
या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम,
दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व
ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६
साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर
पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात
आले. दि. डिसेंबर ३१ १९७१ साली केरळ
राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच
ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन
झाले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


(जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत,)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे
राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते.
आपल्या आगळ्या कार्यपद्धतिमुळे ते 'लोकांचे
राष्ट्रपति' म्हणून लोकप्रिय झाले.
त्यांचे पूर्ण नाव डॉ अबुल फकीर जैनुलाबदिन
अब्दुल कलाम असे आहे. त्यांचे वडील
रामेश्वरमला येणार्या यात्रेकरुंना होडीतून
धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय
करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे.
डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण
रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून
जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले.
शाळेत असतनाच गणिताची त्यांना विशेष
आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट
जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी.
झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ
टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला.
प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे
नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून
त्यांना पैसे दिलेे आणि तेव्हापासूनच डॉ. कलाम
यांना पैशाचे महत्व पटले. या संस्थेतून
एहोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर
१९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व
विकास संस्थेशी त्यांचे नाते जूळले. लहान
वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम
गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान
मोठी कामे करुन पैसे कमवीत व घरी मदत करीत.
त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.
पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे
मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा'
या प्रसिध्द संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस
टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली.
मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय
असणार्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच
या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले.
त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते
पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार
करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे.
१९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत
(इस्त्रो) मध्ये दाखल झाले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल
३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले.
साराभाईनी भारतात विज्ञान
तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम
यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे
त्यांनी सार्थ करुन दाखविले. नंतर साराभाईंचेच
नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश
केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान
असताना भारताने क्षेपणास्त्र
विकासाचा एकात्मिक कार्यक्रम
हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम
पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर
त्यांचा भर असतो व सहकार्यांमधील उत्तम
गुणांचा देशाच्या वैज्ञानिक
प्रगतीसाठी उपयोग करुन
घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र
विकासकार्यामधील 'अग्नी'
क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ.
कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.
पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम
करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
त्यांनी अनेक
प्रभावी धोरणांची आखणी केली.
विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम
मनाने खुप संवेदनशील, साधे व सरळ आहेत.
त्यांना रुदवीणा वाजण्याचा,
मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत
सरकारने 'पद्मभुषण', 'पद्यविभुषण' व १९९८ मध्ये
'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन
त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे
अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत.
येत्या वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते
पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतित करुन
विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून
जगातील सर्वात
मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड
झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव
प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे

डॉ. अनिल काकोडक


(जन्म : नोव्हेंबर ११, १९४३)
डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध
अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूऊर्जा मंडळाचे
अध्यक्ष आणि भारत
सरकारच्या अणूऊर्जा विभागाचे प्रमुख
अधिकारी आहेत(सन २०११).
भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी होमी भाभा अणू
संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक
होते.
वेबसाईट निर्मिती व रचना : श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०