शाळेविषयी

                        मराठवाडय़ातील जालना जिल्हा काहीसा    मागास भाग .येथील भोकरदन तालुका .या तालुक्यातील आव्हाना हे ऐतिहासिक गाव.गावातील गणेशवाडी छोटी वस्ती                        येथे 2009 साली वस्ती शाळेतून जि. प.प्रा. शा. गणेशवाडी शाळा सुरू झाली .या छोट्या  शाळेत 13 जुलै 2010   रोजी गायकवाड आर. बी.हे  शिक्षक रुजू झाले. 2010 साली पट 16  होता.
                       शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गावंडे  व इतर पालक यांच्या मदतीने 20000  रूपये संगणक व जि . प.  सदस्य कडून एक  असे दोन संगणक मिळवले.शेतात फिरणारी मुले संगणक माउस सोबत खेळायला लागली.2012 साली आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.
                        2013  साली पट 51 आहे. शाळेची  iso साठी तयारी चालू आहे. शाळेतील मुले आपल्या भविष्याच्या पाऊलखुणा आपल्या शिक्षकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

                          प्रा. शा. गणेशवाडी शाळेने ग्रामविकास  विभागाच्या शाळा स्वयंमुल्यमापन श्रेणी मधे सलग दोन वर्षे दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
जालना जिल्हय़ातील भोकरदन तालुक्यात जि. प.प्रा. शा. गणेशवाडी येथे संगणक अध्यापन चालू झाले  .संगणकाचे महत्त्व इतर शिक्षकांना पटले..हाच आदर्श समोर ठेवून प्रा. शा. तांदूळवाङी( वाळके सर), प्रा.शा. घोङेवाङी(पाटील सर), प्रा. शा. कोदोली नवे(रायते सर) ,प्रा .शा. बाभुळगाव बेराड सर), प्रा. शा. मालखेङा, प्रा. शा. ठालेवाङी , प्रा. शा. गोकुळ, प्रा.शा.इब्राहीमपुर  अशा अनेक ठिकाणी शाळेत संगणक शिक्षण सुरू झाले.यामधीझाले.यामधील बर्‍याच शाळेत E-LEARNING चालु आहे.संगणक   शिक्षणाची मुहूर्तमेढ  प्रा. शा. गणेशवाडी शाळेतून निर्माण झाली.
श्री. गायकवाड सर यांनी सुरू केलेल्या संगणक शिक्षणाचे  लोन सर्वत्र पसरत आहे.

                     याच सर्व कारणांमुळे शाळेची पटसंख्येमधे प्रत्येक वर्षी वाढ होत आहे .


No comments:

Post a Comment

वेबसाईट निर्मिती व रचना : श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०